निसर्ग
निसर्ग
1 min
335
लाभले निसर्गाचे मानवा वरदान
खरोखर हा भूमीवर भाग्यवान
आनंदे नांदते इथे थोर न सान
निर्मिती ईश्वराची ही महान
इथे वसले नंदनवन
सुगंधी अन मनोहर उपवन
नटली धरणी हिरवाईने
किलबिलती तर हे पाखराने
तुझ्याच साठी हे निर्मिले
हो मानवा सावध रे
कर तू संरक्षण अन संवर्धन रे
नको आततायीपणा
वाग जरा नीतीने
ईश्वराचे असे उपकार
जपुनी आपले सुसंस्कार
