STORYMIRROR

Sushama Gangulwar

Others

3  

Sushama Gangulwar

Others

निसर्ग

निसर्ग

1 min
226

निसर्गा रंग तुझा न्यारा

कुठे पाडतोयस गारा

तर कुठे पावसाच्या धो धो धारा

तर कुठे नुसता स्प्रेचा फवारा


कुठे आभाळ दाटलंय

तर कुठे भिरभिर वारा

कुठे वाहताेय संथ झरा

तर कुठे मोर नाचतोय

फुलवून पिसारा


कुठे तू कोपलायेस 

म्हणून वाहून जातोय

संसार सारा

तर कुठे तुझी नजर नाही पडली

म्हणून चातकही फिरतोय

उपासमारा


कुठे पडतायेत सरींवर सरी

तर कुठे नुसत्या झिमझिम धारा

शेतकऱ्यांचा हरवलाय सहारा

तुला माहित आहे का

मान्सून ऋतू सर्वांनाच असतो प्यारा


Rate this content
Log in