STORYMIRROR

Deepak Ahire

Others

3  

Deepak Ahire

Others

निरपेक्ष प्रेम...

निरपेक्ष प्रेम...

1 min
247

स्वतःवर करा निरपेक्ष प्रेम

एकमेवाद्वितीयाबद्दल बाळगा अभिमान, 

तुम्हीही राहा स्वतःच्या सहवासात

कार्यरत हाेईल तुमच्या यशाचा बाण... 

स्वतःशी केलेली स्वतःचीच स्पर्धा

स्वतःला करत असते समृद्ध, 

स्वतःची स्वप्रतिमा विकसित करून

आपण हाेत नसताे कधी मनाने वृध्द... 

प्रेम तुम्हाला आतून करतं

व्यापक आणि विशाल, 

प्रेम मिळवतं प्रत्येक गाेष्टीवर विजय

स्वःआनंदासाठी पांघरावी प्रेमाची शाल... 

आपल्यावर प्रेम करणारे आहेत

हे बघता माणूस चांगलं काम करताे, 

प्रेममयता वाढवते क्रियाशीलता

प्रेमच इतरांसाठी जगायला शिकवतं... 


Rate this content
Log in