STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

निरोगी जीवन

निरोगी जीवन

1 min
599

आपले आरोग्य । निरोगी जीवन ।।

ध्यास मनोमन । सर्वकाळ ।।१।।


अवेळ टाळावी । जीवनशैलीची ।।

छाया वाईटाची । मोहमाया ।।२।।


निश्चय नित्याचा । रोज व्यायामाचा ।।

पथ्य पाळण्याचा । स्वतःसाठी ।।३।।


घेऊनि वचन । कुटुंब सोबत ।।

वसा स्वप्नवत । आनंदाचा ।।४।।


पौष्टिक आहार । मंत्र कायमचा ।।

प्रसन्न मनाचा । स्वच्छ देह ।।५।।


शीतल तेजोमय । चेहऱ्यावरचे ।।

नाही सौंदर्याचे । दडपण ।।६।।


विचार सुंदर । चांगली वाच्यता ।।

मनाची शांतता । सत्कर्माची ।।७।।


सुदृढ आरोग्य । वाढवेल शान ।।

ठेवा बहुमान । शरीराचा ।। ८ ।।


Rate this content
Log in