STORYMIRROR

swati Balurkar " sakhi "

Others

3  

swati Balurkar " sakhi "

Others

निर्णय तुझा !

निर्णय तुझा !

1 min
12K

भावनांचा कल्लोळ कधी कधी मनी दाटू दे. .

कधीतरी तुझी रात्र ही तुला अपराधी वाटू दे!


किती दिवस राहशील कैद आठवणीत तू

मुक्त एकदा अश्रूत वाहूनही बघ ना रे !


माझ्या मनाचा तो कप्पा, आताही तुझा का असावा

तुझ्या जीवनात मात्र माझा मागमूसही नसावा?


का व्यापतोस आयुष्यातली संध्याकाळ माझी

मी कधीतरी उधार मागीतलीय का ती पहाट तुझी?


आता पुरे कर ना छळणं , गोष्टी आता जुन्या झाल्या

आपल्या मुलांसोबत पुन्हा आठवणी नव्या झाल्या!


तू निघावस रे माझ्या मनातून आता, कसं ते बघ

डोळ्यातील आसवं बनून निघतोस कि चेहर्‍यावरचं हसू ?


निर्णय आता तुलाच घ्यायचाय ना!

कधी आणि कसा घेतोयस


Rate this content
Log in