STORYMIRROR

Nandini Menjoge

Others

4  

Nandini Menjoge

Others

निर्भया

निर्भया

1 min
348

विषारी ह्या जगात, जीव तिचा गुदमरतो.. 

क्रूर ह्या अंधारास, श्वास कापरा झुरतो.. ||


किती क्रुर ती बुद्धी, का निष्ठुर राक्षस जागतो.. 

इवल्याश्या पाकळीला, असहाय्य यातना देतो.. ||


काळोखाच्या आडोश्याला, भयाण हास्य हासते.. 

लढण्यास तिच्या साक्ष ती, बदनाम रात्र आक्रंदते.. ||


थरथरता जीव मदतीस आर्त हाक घालतो, 

प्रसंग कठोर भय काटा वाऱ्यास बोचतो.. ||


माणूसकीस कापरा थरकाप, भयभीत साक्ष रात्रीची..

निर्भयेच्या झुंझेस संघर्ष नमतो, धैर्य गहिवरतो.. ||


Rate this content
Log in