निर्भय सत्य
निर्भय सत्य
1 min
200
वेध घेऊ जाता ! समाज मनाचा !
वांदा विटाळाचा ! दिसें तेथे ||१||
वर्ण अभिमाने ! विटाळाचे खळ !
पाहावे तें मूळ ! याता याती ||२||
धर्म नागवीला ! धर्मां वाचू निया !
धर्मी गेला वाया ! निधर्मी तों ||३||
भेदा भेद करती ! भांडणे मरती !
नाही उपरती ! तया लागी ||४||
धर्मं अभिमाने ! कोण तरे सांगा !
गेले असे भंगा ! सकळही ||५||
संतदास म्हणे ! आम्हां भयं नाही !
सर्वत्र तें पाही ! आत्मरूप ||६||