निरागसता....
निरागसता....
1 min
135
निरागसता बालकातली येवू द्या अंगी,
तेव्हाच साधेल आपली एकरूपता जंगी...
निरागसता आहे निसर्ग नियमाचे पाऊल,
तेव्हाच सुखाची लागेल तुम्हांस चाहूल...
निरागसता आहे एक दैवी अलंकार,
हीच आहे जीवनातली नित्य नवीन धार...
निरागसता जपवू वाढवू सहकार्याने,
तरच टिकेल जीवनी नाव ही धैर्याने...
