निरागस लीला...
निरागस लीला...
1 min
23.6K
नटखट हा सावळा कान्हा
आईसम मायाळू असे फार
सगळ्या संसारावर त्याचा
प्रेमछायेचा निरागस वर्षाव
गाई-वासरात सदा रमणारा
गोकुळ नगरीचा हा श्वास
बासरीच्या तालावर फुलवी
निसर्गाचा रम्य भव्य देखावा
मधुर हर्षाचा ध्वनी रचती
मनोमनी त्याच्या रासलीला
वृंदावनी सगळेच प्राणी जीव
मंत्रमुग्ध होऊन करी क्रीडा
