निःस्वार्थ
निःस्वार्थ
1 min
203
निःस्वार्थ मनास
न कशाची भीती
समाज सेवेने
किर्ती मिळे हाती
निःस्वार्थ राहणे
खूपच कठीण
दुनियादारीत
बने स्वार्थी मन
फुलांचा सुगंध
पक्षांचा विहंग
निःस्वार्थ भावना
मैत्रीचा हा रंग
सूर्य तळपतो निःस्वार्थ,
धारा बरसती निःस्वार्थ,
वृक्ष देती छाया निःस्वार्थ,
मानवच का साधे स्वार्थ ?
