निद्रानाश एक कोडे
निद्रानाश एक कोडे
1 min
401
डोळ्यात झोप नसता
ऊठवावे कुणास आता
मज कळत नसे काही
मी आढ्याकडे पाही
टिकटिक घड्याळाची
संगत रात किड्यांची
मज सोबतीस राही
देत जागेपणाची ग्वाही
कुत्री भुंकती केव्हा
विचार संपती तेव्हा
चोरांची भीती राही
मी उगाच दचकून जायी
गेली कुठल्या गावी
कुठे हिला शोधावी
वाट किती पहावी
मलाच समजत नाही
निद्रा म्हणा की झोप
झालाय माझा कोप
कोडे नसावे सोपं
सुटता सुटेना काही
