STORYMIRROR

Deepa Vankudre

Others

4  

Deepa Vankudre

Others

न्हाला दवात गारवा

न्हाला दवात गारवा

1 min
258

वेध गुलाबी थंडीचे, कोणी येईल हा भास!

मनी काहूर माजले, एका स्पर्शाची ही आस!


सुख हिंदोळे हे घेई, मनी आठवण दाटे,

ऊब देईना देईना, वारा हळवा पहाटे!


न्हाला दवात गारवा, बिंदू घालती रांगोळी, 

लाली रविकिरणांची, प्रभा उधळे आभाळी!


मेघ केशरी गगनी, पिंगा वाऱ्यावर घाली,

पाखरांचा कलरव, सांगे सांजवेळ झाली!


नभी तारकांचा साज, निशा सजली खुलली, 

पहा शिशिर तो आला, दारी पाऊले वाजली!


साहित्याला गुण द्या
लॉग इन