नदी
नदी
1 min
138
उगम आहे तिचा
उंच डोंगरावर
उंचावरून येते ती
निळ्याशार पृथ्वीवर
नदीमाय आहे ती
माय समद्यांची
आख्ख्या जगाची
तहान भागवते पाण्याची
आपल्या सोबत येईल ते
घेवून बरोबर जाते
नदीमाय कधीच
ना बोलते ना आनंदते
कधी उद्रेक करते
कधी शांत वाहते
पाण्याचा झुळझुळ
आवाजकरत गाली हसते.....
नादुर्गंधाची तक्रार
ना गढूळ *पाण्याची* भ्रांत
नदीमाय वाहते
संथ आणि शांत.....
सतत कामाचा ध्सास
तिच्याकडून शिकावा
ळाट अडवून तिची
बंधारा पण बांधावा
देणे तिचा गुणधर्म
माहिती आहे जगाला
प्रेमाचा झरा तिचा
पाहून आनंद होतो मला
