STORYMIRROR

Prashant Kadam

Others

3  

Prashant Kadam

Others

नाव सजव

नाव सजव

1 min
390

नारली पुनव आयली 

नारली पुनव,

दर्याच्या राजा नाव सजव


नाव सजवू नी शिडं ओढू

दर्याला आपल्या नारल देऊ

किरपा दर्याची घेऊन भाळी

नाव आणू या दर्यापाशी


नारली पुनव आयली 

नारली पुनव,

दर्याच्या राजा नाव सजव


एकवीरा आईला नवस बोलू

प्रसादीला तिला कोंबडं देवू

किरपा घेवून तिची डोईवरी

डोलकर जातील दर्यामंदी


नारली पुनव आयली 

नारली पुनव,

दर्याच्या राजा नाव सजव


नाव नेवू या समिंद्रामधी

जाल घालू या मंधोमंदी

एकवीरा आईचं नाव मनी

म्हावरं गावलं जाल्यामंदी


नारली पुनव आयली 

नारली पुनव,

दर्याच्या राजा नाव सजव


नाखवा वल्हव रे नाव तुझी

सजलीया जनू ती रानीपरी

आठव घरची देईल तुला

सुखरूप आणील किनारीला


नारली पुनव आयली 

नारली पुनव,

दर्याच्या राजा नाव सजव


नारली पुनव आयली 

नारली पुनव,

दर्याच्या राजा नाव सजव!


Rate this content
Log in