नात्यांची गुंफण....
नात्यांची गुंफण....
1 min
257
नात्यांची गुंफण
करावी प्रेमदार.
जपावी ती ऊबदार.
झालाच कधी गुंता
तर....
सोडवावा तो हळुवार.
नात्यांची गुंफण टिकून ठेवणं
म्हणजे संस्कार टिकवणं-वाढवणं
त्यात नसतो हिशोब पैशांचा
तिथे असतो वर्षाव फक्त
निस्वार्थ प्रेमाचा,मायेचा.
एकमेकांना समजून घेऊन
कायम जपण्याचा.
नात्यांची गुंफण असावी तिला नसावे,
गैरसमज आणि संशयाचे कोंदण
त्याला असावे अतुट विश्वासाचे बंधनं.
नात्यांची गुंफण......
म्हंणजे प्रत्येकाला जन्मताचं
लाभलेलं सुंदर आंदण.
