Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Bharati Sawant

Others

3  

Bharati Sawant

Others

नातं तुझं माझं

नातं तुझं माझं

1 min
625


तुझं माझं सख्या जन्मोजन्मीचं नातं

फुललं बहरलं नव्यानं माझ्या अंतरात ||धृ||


दरवळ पसरलाय दूरवर

जवळीक दोघांची सुमधूर

तव स्पर्शाची जादू अनुभवली एकांतात

फुललं बहरलं नव्यानं माझ्या अंतरात ||१||


साखरझोपेत असता मी पहाटवेळी

अनावर तव भावना खेळण्या खेळी

गुरफटले श्वास तुझ्या श्वासांच्या स्पंदनात

फुललं बहरलं नव्यानं माझ्या अंतरात ||२||


न्हालेय सुखात मी तुझ्यासमवेत

समजले डोळ्यांचे इशारे न् संकेत 

फुलव प्रीतीची चांदतज्योत हृदयमंदिरात

फुललं बहरलं नव्यानं माझ्या अंतरात ||३||


Rate this content
Log in