STORYMIRROR

शिवांगी पाटणकर

Others

4  

शिवांगी पाटणकर

Others

नाती

नाती

1 min
355

जपावी लागतात नाती विसरून सारं काही

रुसवे फुगवे धरून मुळी चालतच नाही


ऐकून घ्यावं लागतं सगळ्यांचं गप राहून

उलट बोलून कोणाला मुळी चालतच नाही


विश्वासावरच नाती टिकतात सारी

अविश्वास दाखवून नात्यात मुळी चालतच नाही


जपावी लागतात लहान थोर साऱ्यांची मनं

तोडून मन कोणाचं मुळी चालतच नाही


नात्यातला गोडवा हळूवार उलगडण्यात असतो

घाई करुन नात्यात मुळी चालतच नाही


Rate this content
Log in