नाते
नाते
माणूस माणसातला शोधून पाह्य रे
जाती, धर्माच्या पलीकडे जाय रे
जाती, धर्माचे फास तू तोड रे
मानवाला बंधनातून मुक्त कर रे
माणूस माणसातला शोधून पाह्य रे
जाती ,धर्माच्या पलीकडे जाय रे ।।1।
नाते माणसाने माणसाचे जोड रे
स्वार्थी दुनियेची संगत सोड रे
नाते माणसा, माणसातच शोध रे
मन निर्मळ मानवासाठी ठेव रे
माणूस, माणसातला शोधून पाह्य रे
जाती, धर्माच्या पलीकडे जाय रे ।।2।।।
नको गुलामी कुणावर लादू रे
ते तुमचेच बांधव हाय रे
हक्क स्वातंत्र्याचा, त्यांना मिळू दे रे
नवी विचारांची, विकासाची इच्छा असू दे रे
माणूस माणसातला शोधून पाह्य रे
जाती, धर्माच्या पलीकडे जाय रे ।।3।।
