नाते तुझे माझे
नाते तुझे माझे

1 min

47
माझ्या मागून आलास,
बाळकृष्ण माझा,
कुरळे कुरळे केस,
सावळा रंग तुझा
माझ्याशिवाय तुझे कधी,
हलले नाही पान,
मला आता सोडून तू,
का गेलास इतका लांब
कितीही ठरवले आता तरी,
तुला भेटायला येऊ शकत नाही,
साता समुद्रापार तू,
पूर्वीसारखी भेट नाही
रोजची तुझी सवय मला,
तुझ्याबरोबर भांडायची,
माझी लेक तुझ्याशिवाय,
कधीच नाही जेवायची
आता सारखी आठवण येते,
सण वार आले की,
राखी कशी बांधू तुला,
वाट पाहते तुझी ताई लाडकी