नाते अनामिक ते संगती
नाते अनामिक ते संगती
1 min
277
रोज संध्या समयी ती
ज्योतिसम वात तेवती
ओढ अनामिक भीती
चंचल कजावां लागती
भिरी भिरी पाखरापरी
सांग मना काय शोधीती
सांज गंधाळली ती जरी
नाते अनामिक ते संगती
आसपास गूज पाखराचे
मन भ्रमरास गुंतवति
क्षण अलगद पापाणिस
थेंब दवा चा देऊनी जाती
हलक्या सरी होत्या बरसात
मन अधिर आणिक स्मृती
सागर किनारी गुंजारव ती
बेफान लाट ती पुसत होती
जिव गुंगला ज्या राशित
भाव नभी दाटून ते येती
अनामिका मी तया जीवनी
असावे का उगा गाव पुसती
