नात
नात
1 min
23.4K
नको दव पाती । तुझं माझं नात ।
मातीमोल होतं । क्षणातच ॥ १॥
मातीच्या गंधाच । तुझं माझं नात ।
रानोमाळं होतं । क्षणार्धात ॥ २॥
फुलात सुगंध । सवे मकरंद ।
उधळे आनंद । भ्रमरासी ॥ ३॥
नको बडेजाव । नि नात्याचा आव ।
शुध्द ठेवी भाव । दुजे प्रती ॥ ४॥
जपायची नाती । जपायची माती ।
जपायची जाती । ममतेची ॥ ५॥