नात नि आजोबा...
नात नि आजोबा...
1 min
303
बाबाची मायाळू सावली आहात
आयुष्याची माझ्या सोबत आहात
माझ्यासाठी झुरणारे पितामह आहात
आईप्रमाणे जपणारे वैभव आहात
आदर्शांचा खुला भांडार आहात
मुक्त विचारांचा खजिना आहात
नियमांच्या पडद्याआड न लपता
मला घडवणारे मूर्तिकार आहात
स्वप्नांना माझ्या भरारी देणारे
सद्गुणांचे निर्भय पंख आहात
योग्य मानापमानाचे घोट पचवायला
शिकवणारे समाजभान आहात
व्यक्तिमत्व स्वाभिमान जपणारं
चुकीच्या कामाला फळ शिक्षेचं
नात नि आजोबाचं आपलं नातं
जणू खास बंधन बाप लेकीचं
