न उमगलेला बाप
न उमगलेला बाप
1 min
243
न उमगलेला बाप
आपण समजून घेऊ या
मागे राहिलेला बाप हा
आपण त्याना पुढे नेऊ या.।।१।।
नेहमी आईवरचं कविता
बापाचं गोड-कौतुक गाऊया
भावना मनातल्या मायेच्या
बापावरचं लिहीत जाऊ या.।।२।।
पडद्यामागचा बाप पाहू या
स्वत:चं दु:ख बाजूला ठेवून
लहानाचं मोठं निःस्वार्थी करतो
बळकट पंखाखाली घेऊन.।।३।।
खिसा रिकामा असतानाही
नाही कधीचं नाही म्हणत
मागेल ते आणि त्याचं वेळेला
मुलांसाठी मागीतलेले आणत.।।४।।
लेक सासरी जातानाही
सगळ्याना समजवत असतं
डोळ्यांच्या कडा आवरत
स्वत: मात्र कोपऱ्यात रडतं.।।५।।
