मुलगी झाली हो.....
मुलगी झाली हो.....
1 min
454
मनातल्या आधाराला
प्रारब्ध मज पावले हो,
नशिबवान असे किती
मज मुलगी झाली हो.....
ईश्वर कृपेने मातृत्वात
कन्यारत्न जे मिळाले,
जीवनाच्या साऱ्या कष्टाचे
चीज असे जणू झाले.....
ममतेचा,अन् संस्कारांचा
खळाळता ती असे झरा,
तिच्या अस्तित्वानेच लाभते
सुख ,समृद्धी या घरा....
अंतःकरणात अगाध माया
मुलगीच खरी देतसे छाया,
आयुष्याच्या सांजवेळी
तिच असे भक्कम पाया.....
मुलगी झाली हो
आनंद आला हो,
सुखाचा झंकार
क्षणोक्षणी झाला हो...
