STORYMIRROR

Babu Disouza

Others

4  

Babu Disouza

Others

मुकनायक

मुकनायक

1 min
385

नका अडकवू जातीच्या चौकटीत बाबांना

निर्मूलनात त्याच्या केला संघर्ष सवर्णांना


स्वयंभू व्यक्तीमत्वाचा धनी नररत्न भीम

तारणहार दीनदुबळ्यांचा श्रध्दा असीम


गरिबीतही सोडला नाही शिक्षणाचा ध्यास

विद्वत्तेचा महामेरू हा नवपर्वाचा व्यास


दिले लोकशाहीला संविधानाचे वरदान

शहाणे करून सोडले सारे जन नादान


अन्यायाला वाचा फोडायला लेखन एल्गार

मुकनायक वृत्तपत्राने चेतला अंगार


भोगले जातीभेद चटके समाज निदान

आज भीमशक्तीला दे बळ त्यांचे बलिदान


निर्मल चारित्र्य, उत्तुंग विभूती विलक्षण

स्मरू त्यांना मुकनायक शताब्दी सोनक्षण


Rate this content
Log in