STORYMIRROR

Prashant Shinde

Others

2  

Prashant Shinde

Others

मुख्यमंत्री.. अभंग..!

मुख्यमंत्री.. अभंग..!

1 min
152

डोळे उघडून।पहा एकवार।


करतात वार ।राष्ट्रवादी।


जरा रे जपून।दोस्ती ही करावी।


मगच मारावी ।उडी त्यात।।


बोल बच्चन हे। तुझ्याच बाजूला।


छळण्या तुजला। आले होते।।


मी एक आधार।मीच तुझा भाऊ।


देतो ना रे खाऊ। रडू नको।


उप मंत्री पद।ठेवले राखून।


देतो रे जोखून।वेळो वेळी।


घे जरा धीराने ।राज्य हे आपले।


जरी ते मातले।हळकुंडे।


तूला मी ,मला तू । हेच नाते साधे।


करू पूर्ण वादे। युतीसवे।।


झाले गेले सारे।गंगेला मिळाले।


सूर हे जुळले।पुन्हा बघ।।


दोघेच मिळून।सत्ता स्थापूयाकी।


हात धरुयाकी ।प्रेम भावें।।


आता हे सांगतो।मीच मुख्यमंत्री।


उप मुख्यमंत्री।तुझा पुत्र।।


नाही काही फेर।त्यात हा होणार।


राज्य राहणार।पुर्णकाळ।


झाला की अभंग।हा जनतेसाठी।


केला प्रेमापोटी। मनोभावे।।



साहित्याला गुण द्या
लॉग इन