मुखवटा
मुखवटा
1 min
150
किती रखडले किती अडकले
धागे गोंधळात सारे सापडले
फिरत फिरत गोल फिरती
निम्मित मात्र होवून जाती
बुंधे पाने बावचलत बघती
नुसतीच स्वप्ने ताटकळत राहती
मागून मनास लगेच विसरणे
थांबून हव्यास मधेच मागणे
स्वतःला फसवून मुखवटा ओढती
सगळ्यांना जमवून आव आणती
गाठ बांधणीची नाही साधी
खूणगाठ मनाशी वाही आधी