STORYMIRROR

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Others

5.0  

Dr. Razzak Shaikh 'Rahi'

Others

मतदाराची आरती

मतदाराची आरती

1 min
42.1K


जयदेव, जयदेव, जय मतदार राजा

वाजवू नको, निवडणुकीत बाजा

तूच माता अन, तूच रे पिता

वंदितो चरण, तुझे येता-जाता

जयदेव जयदेव....


दर पाच वर्षांनी, होतो हा त्रास

पण तू निवडून देतो, मजला हमखास

थोडासा ‘प्रसाद’, करी तुला खुश

तुझ्याच कृपेने मी, जगतो बिनधास

जयदेव जयदेव...


तुझ्या जीवावर, जगात मी हिंडतो

संसदेत इतरांशी, मनसोक्त भांडतो

प्रगतीचे तुजला, दाखवून गाजर

‘विकासाचा’ आलेख, सदैव मांडतो

जयदेव जयदेव...


स्विस बँकेत ठेवलाय, गडगंज पैसा

विचारू नका मी, कमविला कैसा

निवडूनी द्या आता, पुत्राला माझ्या

बाप जसा त्याचा, बेटाही तैसा

जयदेव जयदेव...


विचार नका, करू काहीबाही

करीत नाही मी, घराणेशाही

रुजलीय रक्तात, आमच्या लोकसेवा

शिखरावर नेऊ, आम्ही लोकशाही

जयदेव जयदेव...


Rate this content
Log in