मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे
मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे
कोट्यावधी नागरिकांचा हा,
पुरातन,गौरवशाली इतिहास असलेला,गणराज्य देश..
सहिष्णुतेचा,स्थायीभाव,
कणाकणांत,मुरलेला देश...
पाच हजार,वर्षाची परंपरा,
लाभलेला,विशाल देश..
गंगा जमनी,संस्कृतीत, कधीकाळी,
सुवर्णकाळ पाहिलेला देश...
एका छत्राखाली,विविध धर्म,गुण्यागोविंदाने नांदवणारा देश...
दडपशाहीला, अन्यायाला झुगारून, उभा राहणारा देश...
पारतंत्र्यात,गुलामी सहन करणारा देश,
पारतंत्र्य,सरंजामशाहीशी,
दोन हात करणारा देश...
सत्य,अहिंसा,पंचशील,
जगांला,शिकवणारा देश...
विविध भाषा,वंश,जात पात,प्रांत,
विवीध असले तरी,
लोकशाहीवरती दृढ विश्वास,
असलेला देश....
संविधानाने,प्रत्येकाला मतदानांचा दिलेला हक्क,
त्याद्वारे,जनतेने,जनतेसाठी,जनतेचे ,भयमुक्त वातावरणात चालवलेले सरकार ,
दर पाच वर्षांने,निवडणुका होतात,निष्पक्ष निवडणुक आयोगाच्या,नजरेखाली,त्यात नाही फरक..
मतदानासाठी, उन,पाऊस,थंडी वाऱ्यांत ही काम करणारे,
रांगा लावणारे नागरिक...
झुंडशाही,गुंडशाहीला विरोध,
करित निर्भयपणे,मतदान करणारे लोक....
अबलांना गुंडापासुन संरक्षण देणारे,
अल्पसंख्याक ,भटक्या विमुक्तांना ,प्रगतीची द्वारे खोलणारे...
आरोग्याची,हमी देणारे
घराघरांत,झोपडीत,
गोरगरिबांचे,आदीवास्यांच्या, समस्यांचे,निराकरण करणारे,
शेतकऱ्यांना कर्जमुक्त,पिकांना भाव देणारे,
अन्नदात्याला,
सुख समृद्धी देणारे सरकार,
गरिबांचे अश्रु पुसणारे,
शिक्षणाचा,हक्क प्रत्येकाला देणारे..
स्रीयांना समान हक्क देणारे,
औद्योगिक,भांडवलदार,कलाकार,
व्यापारी सर्वांना न्याय देणारे,
न्यायपालिकांना, ग्रामपंचायतींना स्वतंत्र अधिकार देणारे..
जातीधर्मात सलोखा, बंधुभाव निर्मिणारे, परकिय आक्रमकांवर जरब धाक निर्मिणारे, फुटीर आतंकवाद्यांना ठेचणारे स्वप्नवत
सरकार निर्मिण्यासाठी,
प्रत्येकाने बजावलाच पाहिजे मतदानाचा,बहुमोल हक्क......
