मतदाना
मतदाना
1 min
390
मतदानाला जा हो
ताई,दादा,अक्का
मतदान करणारच
असा विचार करा पक्का।।
पुन्हा पाच वर्ष तुम्हाला
पाहावी लागेल बर वाट
मतदानाच्या दिवशीच
असतो मतदाराचा थाट।।
मतदान करूJव्वो न द्या देशा
आपले अमूल्य योगदान
सारे जण मिळून करू या
न चुकता आपले मतदान।।
प्रत्येकाच्या बोटाला आता
लागली पाहिजे काळी शाई
ताई,दादा अन अक्का तुम्ही
मतदानाची करा बर का घाई।।
मतदारराजा आहेस
राजासारखा तू वाग
मत देण्यासाठी तुझे
आता तरी राजा जाग।।
