मतदान शुभ कार्य
मतदान शुभ कार्य
किती हायसे वाटतेय
मतदान वेळेत केल्याने
कित्येकानी गमावली संधी
मतदानास न गेल्याने।।
साठ टक्के च्या वर
मतदान नाही सरकत
चाळीस टक्के जनता
मतदानास नाही फिरकत।।
काहीच वाटत नसेल का
या मतबुडव्याना लाज
मतदान न करता कुठे
फिरत होते हे सारे आज।।
शासनाने दिली सुट्टी
तरीही मतदानात नाही वाढ
निर्लज्ज सरळ म्हणतात
चल कुठे तरी पिकनिक काढ़।।
आपले अधिकार घेण्यात
करत नाही आपण दिरंगाई
कर्तव्य पालनात का बरे
करतोय आपण अशी कुचराई।।
कोणी करावे मतदान
लांब रांगेत उभे राहून
म्हणणारे हॉटेलात खातात
जेवण्यासाठी वाट पाहून।।
मतदानाचा हा निरुत्साह
एक दिवस अंगावर येईल
आपला देश सांभाळायची
जबाबदारी कोण शिरावर घेईल।।
या मतदान न करणाऱ्या
महाभागांचे काय करावे
तुम्हीच सांगा राजेहो
यांना शासन काय करावे?।।
