मर्मबंधातली ठेव
मर्मबंधातली ठेव
1 min
186
तोडणे न आता होई
हे बंध रेशमाचे
गुंफली प्रीत मनमोहना
जाणती भाव अंतरीचे....
वाहिली तुला सर्वस्व
हि मर्मबंधातली ठेव
स्वाधीन केले तुला
हृदय माझे एकमेव.....
बहरेल प्रेमवेल
सुखाची येता लहर
ओंजळीत माझ्या प्राजक्त
जीवनानंदी येई बहर.......
तोडू नको बंध जीवनाचे
ही आर्त स्पंदनांची
आण घाली एकमेका
दिल्या घेतल्या वचनांची....
