मृगसरी
मृगसरी
1 min
67
मनसोक्त बरसतात
या रिमझिम मृगसरी
चिंबचिंब भिजली धरा
हरीत शालूत दिसते भारी....
पारिजातकाचा मस्त
सुगंध गगनी दरवळला
वसुंधरावर या फुलांचा
सडा छान शिंपडला....
अवखळ अल्लड वारा
बोलतोय मस्त कानात
मातीचा धूंद सुगंध
पसरला दाही दिशात,..
हरीत वस्त्र घालून
सारी सृष्टी सजली
दवबिंदूंच्या थेंबाने
अंग अंग मोहरली.....
प्रीत तुझी माझी
पावसा मस्तच जमली
येतो बरसतो मनसोक्त
वसुधाही छान सजली.....
