STORYMIRROR

Sangita Pawar

Others

4  

Sangita Pawar

Others

मृगाचा पाऊस

मृगाचा पाऊस

1 min
253

आला पावसाळा ऋतु

बहरली तरु - फुले

होड्या पाण्यात सोडून

खेळतात सान मुले ||१||


आली शिवारात स्वारी

पावसाचे गीत गाते

रानी पावसाची धून

पोशिंद्याचे असे नाते ||२||


थेंबांचाही टप - टप  

सुटे मोकाटही वारा

दामिनीही कडाडली

अंगणात वेचू गारा ||३||


इंद्रधनू लपंडाव

पाखरांचा घुमे नाद

गुंजारव भ्रमरांचा

निसर्गाशी घाली साद ||४||


भिजुनिया चिंब होता

नववधू जशी नटे

शालू हिरवा नेसून

धरा अंबराला भेटे ||५||


आला मृगाचा पाऊस

ऋतू हिरवा बरवा

घुमे झाडात पारवा

असे हवेत गारवा ||६||


Rate this content
Log in