मृग किमया
मृग किमया
1 min
27
धूळवाफा पेरणीला शेत नांगरलं
नभी मृगनक्षत्र साजरं उतरलं
आले मेघ काळे धरणीला गोंजारलं
सोसाट्याच्या वाऱ्याने राणीला विचारलं
वाट कुणाची पाहते नजरी भारलं
होता कृपेचा वर्षाव अस्तित्व तारलं
भुईच्या उदरी लपलेलं तरारलं
वानोळा द्यावया दसपटी शिवारलं
रूजेल बियाणं ओलावून धारलेलं
पुन्हा एकवार मृदूस्वप्न भरारलं
