मृदगंधित सुटले वारे.....
मृदगंधित सुटले वारे.....
( चाल : भले बुरे ते घडून गेले......)
निळे नभ ते भरून आले,
अंधारून ते गेले सारे .
घुसमटलेल्या मनात कारे ,
सुसाट सुटले वादळ वारे ...॥ धृ ॥
भिरभिरते वरून खाली,
पाचोळ्या सह वादळ वारे.
मनात माझ्या खद खदणारे,
पक्षी वृक्षी चुळबुळती रे...॥ १ ॥
मेघ नभी गर्जत आले,
घेऊन आले थेंब टपोरे.
धडधड ती उरात का रे,
गेले भिजवून चिंबच सारे..॥२॥
चंचल चपला चमकून गेली,
गेले तम ते उजळून सारे .
दचकून उठते अशी का रे ,
अंगावर उठती तरल शहारे..॥३॥
मेघ सारे बरसूनी गेले ,
अंगणी गारा, शुभ्र तारे.
जुळून येता स्वरही सारे,
मृदगंधित सुटले वारे.....॥४ ॥
