मृदगंध पावसाचा किमया निसर्गाची
मृदगंध पावसाचा किमया निसर्गाची
पाऊसाचं आणि निसर्गाचं झालं ब्रेकअप
रुसलेल्या पावसामुळे निसर्ग झाला कुरूप...
कधीच भेटणार नाही तुला असे पाऊस गेला सांगून
निसर्ग म्हणाला, वृक्षलागवड व संवर्धन केल्यास
येशील न राहवून...
रागारागाने पाऊस आपले ढग घेऊन गेला
पाणी नाही म्हणून निसर्ग मात्र हिरमुसला...
कोरडी झाली धरती सुकून गेल्या वेली,
हिरवीगार वसुंधरा पिवळी होऊन ओसाडली...
निसर्ग सृष्टीची दुर्दशा बघून
पावसाला आले भरून
काय उपयोग असतो म्हणे
उगाचच रुसून फुगून...
निसर्गाने पावसाला मनापासून घातली साद
इगो बाजूला ठेवत धो धो बरसून दिली दाद...
प्रेमाने आला ओला वारा
ओल्या मातीचा सुगंध न्यारा...
रिमझिम बरसणाऱ्या सरींमध्ये,
बालगोपाल न्हाती भिजती
मोर थुई थुई नाचती
खळखळ झरे वाहती
पानोपानी फुले बहरती
निसर्ग सृष्टी भूरळ घालती...
निसर्ग म्हणतो पावसाला
पुन्हा नको भांडायला
एकमेकांच्या सोबतीने
आज आनंदी आनंद झाला...
