मराठीचा महिमा
मराठीचा महिमा
आई मला लागली
लागली भूक मराठीची
आई मला लागली
लागली तहान मराठीची
आई मला जडले
जडले व्यसन मराठीचे
वेड लागले लागले वाचण्याचे
आई मला पाहिजे
पाहिजे पुस्तक वाचायचे
छंद मला वाचण्याचा
वाचण्याचा लई लागला
टीवी.मोबाईल नको आता
मला टाईमपास करण्याला
आई मला शिकून लई मोठ्ठं व्हायचं
जगाचं अज्ञान मला घालवायचं
मराठी भाषेचे महत्त्व मला वाढवायचं
तिचे संस्कार अंगी मला बाणायाचे
तिचे रसाळ,मृदू शब्द मला बोलायचे
अशी सर्वांची माय बनली मराठी
मराठी माणसाच्या शब्द निनादले ओठी
असा गोडवा माय मराठी भाषेचा
स्वाभिमान जागला मराठी भाषिकाचा
जीवनी आनंद दिला मराठी रसिकाला
मार्ग जगण्याचा मराठी भाषेने दिला
मराठी भाषा झाली ज्ञानाचे विश्व भांडार
अगाध महिमा भरला साधू,संतांच्या विचारावर
