मराठी शान श्वासात
मराठी शान श्वासात
माय मराठी आपुली
सन्मानाने वर्णू संस्कृती
भाषेचा बहू अभिमान
देशाची जाणती शान
विविधतेची काया महान
महाराष्ट्राचा श्वास वारसा
कौतुकी मराठी मायबोली
शब्दांची रेलचेल मान
साधुसंतांची वाणी खाण
भवितव्याची सुंदर ठेव
शूरवीरांची ही मायभूमी
शौर्याचा इतिहास रक्षक
स्वप्नात विश्वास मराठी
व्यक्तिमत्वाचा भास स्मित
भाग्याचा जीवन कळस
विविध गुणांचा शिखर
जातपात ठाऊक नाही
काळजात भेद नाही
हिच्या संगतीत महिमा
अवघ्या सृष्टीचा कर्ताधर्ता
मुखात मधुर गोडी
मुक्यास वाचा फोडी
थोर पुण्याईची माय
श्वासाश्वासात मुक्ताई
