मराठी पाऊल
मराठी पाऊल
1 min
11.3K
जवळच्या वाटतात भावना
मराठी भाषेतून मांडलेल्या
सोज्वळ, साध्या शब्दातून
स्वभाव गुण अनुभवलेल्या...
महाराष्ट्राच्या कुशीत प्रेमाने
मातीत मराठमोळ्या जगता
मराठी पाऊल हे पडते पुढे
घडवण्या क्रांतीची महानता...
साधू, संतांची देणगी लाभली
लेखणी साहित्य वरदहस्ताची
पारंपारिक प्रकारांची मांडली
चित्रित मनोमनी वास्तवाची...
बदलती पावले आजही येतात
अनुभवता विचारी संस्कृतीची
समाजभान जपताना गवसते
वाटचाल मानवा सहानुभूतीची...