मराठी भाषा
मराठी भाषा
1 min
351
महाराष्ट्र राज्य माझा
मराठी माझी राजभाषा
मराठीचा मला अभिमान
भाषेचा मला आहे स्वाभिमान
मराठी आमची भाषा
देशप्रेमाची सुंदर रेषा
सह्याद्रीच्या पर्वतरांगा
तलवारीची धार आमच्या अंगा
शिवाजीचा इतिहास
सांगतो आम्हा मराठी
पराक्रमाची ही भूमी
शुरावीरांची नाही कमी
बोलतो आम्ही मराठी
आमुची माय मराठी
जाती-धर्म जरी अनेक
पण आम्ही राहतो सगळे एक
