STORYMIRROR

Vrushali Vajrinkar

Others

3  

Vrushali Vajrinkar

Others

मराठी असे आमुची मायबोली

मराठी असे आमुची मायबोली

1 min
303

मराठीचा गोडवा काय सांगावा

एक एक शब्दातून अर्थ पाझरावा..

मराठीचे कौतुक फार वाटे आम्हा..

करू जतन तिचे ,वेड हेच ,हाच ध्यास,

मराठी आमचा अंतरंग आणि मुक्त श्वास,

मायबोली मराठीत ज्ञानेश्वरी प्रसवली

मराठीच्या लेकरांना थोर माऊली मिळाली

मायबोली मराठीचा अभिमान मोठा

इथे नाही अर्थ, शब्द, लेखनाचा तोटा...

मराठी मायबोली बोले तैसे वळे

अज्ञानासही गोड गोड मराठी सोपी कळे,

माझी मायबोली मराठी मराठी

मी आहे राखण्या तिचे अस्तित्व

सदैव तिच्या पाठी!!

माझी मायबोली मराठी



साहित्याला गुण द्या
लॉग इन