मोतियाची रास
मोतियाची रास
पोशिंदा जगाचा| माझा बळीराजा|
दुष्काळाची सजा | नको त्याला ||धृ||
पिकवी माणिक | मोतियाची रास|
लागलीय आस | मोल व्हावे ||१||
खपतो राबतो | स्वतः शिवारात|
सारा दिनरात | शेतकरी ||२||
कारभारीणही |असे संगतीला |
पाखडे दाण्याला | न्या बाजारी ||३||
बैलाची जोडीही |औत हा खांद्याला|
भविष्य उद्याला | राष्ट्रसेवा ||४||
साथ निसर्गाची | होईलच कृपा |
पावेल तो बाप्पा | कष्टासाठी ||५||
कडधान्य पिके |उगवे शेतात |
विकूनी स्वस्तात |दलालांना||६||
बैलगाडीतून | सखी सोबतीला|
कुटुंबकबिला | जत्रेसाठी ||७||