मोर्चा एक फार्स?
मोर्चा एक फार्स?
बालक भारत मातेच्या कुशीतलं!
अबोध अनाथाश्रमात वाढलेलं!!
मातापिता ठाऊक नसलेलं!
धर्म जातीचं लेबल नसलेलं!!
रस्त्यानं मोर्चे पाहून धास्तावलेलं!
कुणाच्या सोबत जावं म्हणून भेदरलेलं!!
भारत मातेला घट्ट बिलगलेलं!
माझं कोण यातलं मातेस पुसतं झालं!!
मातेनं त्या हृदयाशी घट्ट धरिलं!
म्हणाली या मातीनं तुला पोशिलं!!
आभाळानं पांघरूण की दिलं!
नदीनं गोड पाणी प्यावया दिलं!!
वृक्षानं गारं छाया व फळ खावया दिलं!
तुला त्यांनी कधी त्याचं बिलं मागितलं?!!
मला का त्यांनी आरक्षण मागितलं?
तरी मी त्यांना माझं संरक्षण दिलं!!
सपुतांना काही रक्षणार्थ सीमेवर धाडलं!
माझ्याशी इमान राखत जे लढलं!!
बाळ तेच तर खरं माझं झालं!
तू पण अर्पण प्राण त्या सम करशील!
त्यांच्या सम तू प्रिय मज होशील!!
की नुसतेच स्वार्थात रस्त्यांवर येशील!
देशाच्या एकतेला व्यर्थ सुरुंग लावशील!!
निर्णय तू रे योग्य जेव्हा घेशील!
तेव्हाच प्रिय मज रे तू होशिल!!
स्वार्था परीस परमार्थ करशील!
भारतमातेचा खरा सुपुत्र शोभशील!!
