मोहना... दर्शन दे कधीतरी
मोहना... दर्शन दे कधीतरी
कांती शामल,मुख मनोहर
रूप तुझे रे हरी
मोहना... दर्शन दे कधीतरी.....
राधे कृष्णा ....राधे कृष्णा ...राधे कृष्णा
राधे कृष्णा. ..राधे कृष्णा.... राधे कृष्णा ..॥धृ॥
त्रिलोका मध्ये भरली आहे
तुझ्याच भक्तीचा भाव
तुझ्या विणा रे नाही दैवत
चलेना अमुची नाव
कनाकनातून ध्यास तुझा रे
रूप तुझे श्री हरी...
मोहना... दर्शन दे कधीतरी ...//
पिवळा पितांबर कटिवर
माथी केशर टिळा
हाती चक्रसुदर्शण
गळा शोभे वैयजंती माळा
अनुपम तुझी छवीरे...
मोहना... दर्शन दे कधीतरी ...//
यमुनेकाठी धून मुरलीची
राधा होई दिवाणी
येती धावत तुझे संवंगडी
मंजूळ गाती गाणी,
नटखट मुर्त तुझीरे....
मोहना... दर्शन दे कधीतरी..//
तूच आहे सखा सोयरा
आहे अमुचा तुच निवारा
करीतो नित्य तुझी प्रार्थना
असुदे लक्ष संसारा
तीमिर उधळ तू सारे...
मोहना... दर्शन दे कधीतरी..//
भाव भक्तीने करू वंदन
नत होती सर्व जन मन
सेवा करण्या करू संकल्प
मिळू दे गरजूंना अनधन
किती गोड तुझे नाव रे.....
मोहना... दर्शन दे कधीतरी..//
गाईगुरांचे करीतो पालन
दह्या दुधाचे करीतो मंथन
जगा देतो उपदेश गितेचा
पापपुन्याचे करीतो मंचन
करवितो भवसागर तू पार रे....
मोहना... दर्शन दे कधीतरी..//
