मोगरा खळी...
मोगरा खळी...




खिडकीत माझ्या पहाटे
दरवळतो मोगऱ्याचा सुगंध
स्मितहास्यात शहारते मन
नाही त्यास गर्वाचा दुर्गंध...
पाहून फुलांनी सजलेले रोपटे
अत्यानंदाची खळी गालावर
पांढऱ्या शुभ्र अशा रंगातली
सुंदरतेची मोहिनी मनावर...
कधी देवाच्या चरणावर गंध
कधी गजरा आठवणींचा बंध
काळजातला मधुर सुवास
अत्तराच्या त्यागात संबंध...
आकर्षक गुलदस्त्यात मान
सजावटीचा एक अलंकार
सुशोभित करे घर-आंगण
मोगरा मज आवडे फार...