मोडलेले मन
मोडलेले मन
1 min
248
रोज रोजची जबरदस्ती
नकोशी झाली आता,
प्रेमाच्या एका क्षणासाठी
जीव कासावीस झाला....१...
ती डोळ्यातील क्रूरता
त्या स्पर्शातील किळसता,
मन माझे मोडून पडले
ऐकून शब्दांची दाहकता....२...
तोडून सारी बंधनांची साखळी
वाटे जावे निघून एकांती,
घ्यावा मोकळा श्वास
ओरडून स्वतःलाच शेवटी....३...
आयुष्याच्या बेरंगी जीवनात
हरवली प्रेमाची संगती,
मन लागेना कोठे आता
कोठे तरी दूर जावे भटकंती....४...
