मोबाईल
मोबाईल
1 min
293
मोबाईल वाटतो फार परफेक्ट
संवाद होतो सारखा निगलेक्ट
मोबाईलचा जमाना म्हणत म्हणत
आपली माणस आपल्याला विसरत
चार्जिंग झालं जरा कमी
जीवाची घालमेल होते नेहमी
फोटो, स्टेटस सगळ फुल्ल
कायम असतात त्यातच मशगुल
आजूबाजूचे काही भान नाही
वेगळ्याच विश्वात रमत राही
म्हणता म्हणता five G येणार
भावनांची आता फाळणी होणार
