मोबाईल एक गरज
मोबाईल एक गरज
1 min
188
आधुनिक या काळात
टिकविण्यास स्वतःस
गरज आहे ज्ञानाची
आत्मसात करण्यास
दूर कितीही असता
बोलू आपण शकतो
दूरदूरच्या देशांची
माहिती सुद्धा जाणतो
मोबाईल वापरावा
अति उत्तम साधन
एकांत ना राही जीवा
करी हा मनोरंजन
अलगद आठवणी
पाहता येई यावर
जतन करून सर्व
आवड देई त्यावर
जरी फायदे असता
आहेत दुष्परिणाम
शेवटी उपकरण
तोटे आहेत महान
जपून वापरा साधन
आहे ज्ञानाचे सागर
नवीन हे तंत्रज्ञान
सर्वांसाठी चमत्कार
