मंत्रमुग्ध...
मंत्रमुग्ध...
1 min
205
मंत्रमुग्ध करणारे
शब्द साेबतीला,
धावून येतात ते
माझ्या आवाजाला...
मंत्रमुग्ध करणारे
काही व्यक्ती वल्ली,
त्यामुळे वाटत नाही
अंतर हे लांबपल्ली...
मंत्रमुग्ध करणारे
वाचावे थोडे तरी,
सुसह्य हाेईलही
जीवनाची वारी...
मंत्रमुग्ध करणारी
असावी कला,
हीच तुमची गाेष्ट
आवडतेय मला...
